शाळेतील विद्यार्थी – स्वच्छतेचे शिलेदार!
ग्रामपंचायत खैरी वलमाझरी अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहिमेत उत्साहाने सहभाग घेतला. विद्यालय परिसर तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यासाठी विशेष स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व समजून घेतले आणि कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी व स्वच्छ परिसर ठेवण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे स्वच्छतेबाबत जागरूकता वाढली असून, समाजात सकारात्मक संदेश पसरत आहे.