ग्रामपंचायत खैरी/वलमाझरीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित 24/7 सेन्ट्रलाईज्ड सर्व्हेलियन्स सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली आहे. ही प्रणाली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सुरक्षा आणि देखरेखीच्या क्षेत्रात एक महत्त्वाचा बदल घडवून आणत आहे. या प्रणालीचा उद्देश गावातील नागरिकांची सुरक्षा वाढवणे, सार्वजनिक ठिकाणांची सतत देखरेख करणे आणि गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे आहे.

"सुरक्षित गाव, प्रगत गाव" या उद्देशाने आम्ही ही प्रणाली कार्यान्वित केली आहे. भविष्यात यामध्ये अधिक सुधारणा करून गावकऱ्यांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.
ही प्रणाली चेहऱ्यांचे अचूक विश्लेषण करते आणि ओळख पटवते. संशयास्पद किंवा ब्लॅकलिस्ट व्यक्तींचा त्वरित शोध घेण्यास मदत करते. गर्दीच्या ठिकाणी घुसखोरी करणाऱ्याकिंवा संशयास्पद हालचाली करणाऱ्यांची ओळख पटवणे सोपे होते
परिसरातील व्यक्ती आणि वाहनांच्या हालचालींवर सतत देखरेख ठेवली जाते. संशयास्पद वाहने किंवा लोक यांची नोंद केली जाते.
गर्दी होण्याच्या ठिकाणी ही प्रणाली सतत डेटा गोळा करून गर्दीचे प्रमाण मोजते. मोठ्या गर्दीमुळे निर्माण होणाऱ्या अनुचित परिस्थिती टाळण्यासाठी त्वरित अलर्ट पाठवला जातो.
विशिष्ट क्षेत्रांमध्ये कोणाचीही विनापरवानगी हालचाल झाल्यास त्वरित अलर्ट मिळतो. संरक्षित क्षेत्राच्या सुरक्षेत सुधारणा.
कोणत्याही संशयास्पद हालचालींवर अलर्ट देऊन त्वरीत प्रतिक्रिया घेतली जाते.
24/7 प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे परिसरावर सतत देखरेख.
मिळालेल्या डेटाचा सखोल अभ्यास करून सुरक्षा धोरणात सुधारणा केली जाते.
संपूर्ण सिस्टीमचे नियंत्रण एका ठिकाणावरून केले जाते.

ही प्रणाली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एक आदर्श पायरी आहे. यामुळे केवळ सुरक्षा सुधारली नाही, तर गावात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोगही केला गेला आहे. ग्रामपंचायत खैरी/वलमाझरीने उचललेली ही महत्त्वपूर्ण पायरी संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरेल.