Grampanchayat Khairi – Walmazari

कन्यारत्न पुरस्कार - महिलांच्या सन्मानासाठी एक प्रेरणादायी उपक्रम!

ग्रामपंचायत खैरी वलमाझरीत महिलांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी “कन्यारत्न पुरस्कार” प्रदान करण्यात येतो. हा पुरस्कार शिक्षण, कला, क्रीडा, सामाजिक कार्य तसेच विविध क्षेत्रांत उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या महिलांना दिला जातो. या उपक्रमामुळे महिलांच्या सशक्तीकरणाला चालना मिळते आणि त्यांना समाजात आदर्श निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. ग्रामपंचायतीचा हा उपक्रम महिला सबलीकरण आणि त्यांचा सन्मान वाढवण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे.