स्वच्छ पाणी, सुरक्षित जीवन - ग्रामपंचायत खैरी वलमाझरी
ग्रामपंचायत खैरी वलमाझरीने ग्रामस्थांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जल शुद्धीकरण संयंत्र बसवले आहे. या संयंत्राद्वारे पाण्याची गुणवत्ता सुधारून ते आरोग्यदृष्ट्या सुरक्षित बनवले जाते. यामुळे पाणीजन्य आजारांमध्ये घट झाली असून ग्रामस्थांचे आरोग्य सुधारले आहे. स्वच्छता व पर्यावरण पूरक व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीचा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे.