Grampanchayat Khairi – Walmazari

लेक लाडकी योजना

लेक लाडकी योजना

लाभार्थी: ० ते १८ वर्षे वयोगटातील मुली
वर्णन: “माझी कन्या भाग्यश्री” (सुधारीत) या योजनेला अधिक्रमित करून, १ एप्रिल २०२३ पासून “लेक लाडकी” योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना केवळ पिवळ्या किंवा केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील मुलींना लागू आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

उद्दिष्ट

  1. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन जन्मदर वाढवणे.
  2. मुलींच्या शिक्षणाला चालना देणे.
  3. बालमृत्यू दर कमी करणे आणि बालविवाह रोखणे.
  4. कुपोषण कमी करणे.
  5. शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे.

निकष / कार्यप्रणाली

  1. १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या जास्तीत जास्त दोन मुलींना ही योजना लागू असेल.
  2. एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास, फक्त मुलीला लाभ मिळेल.
  3. कुटुंब नियोजन प्रमाणपत्र पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आवश्यक असेल.
  4. दुसऱ्या प्रसूतीत जुळी अपत्ये जन्माला आल्यास, एक किंवा दोन्ही मुलींना लाभ मिळेल. मात्र, त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
  5. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक.
  6. लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे बंधनकारक.
  7. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१ लाखांपेक्षा जास्त नसावे.