आंगनवाड़ीAnganwadi

२२22

एकूण विद्यार्थीTotal Students

१०10

मुलेBoys

१२12

मुलीGirls

अंगणवाडी केंद्र खैरीAnganwadi Center Khairi

सौ. प्रमिला शामराव तिरपुडेMrs. Pramila Shamrao Tirpude

अंगणवाडी सेविकाAnganwadi Worker

मो. नं. ८७६६९५०९०Mo. No. 876695090

सौ.शिशुका सिद्धार्थ घरडेMrs. Shishuka Siddharth Gharde

अंगणवाडी मदतनीसAnganwadi Helper

मो. नं. ७०५७९४९०४८Mo. No. 7057949048

अंगणवाडी केंद्र वलमाझरीAnganwadi Center Walmazari

सौ. चंद्रकला सुरेश कापगतेMrs. Chandrakala Suresh Kapagate

अंगणवाडी सेविकाAnganwadi Worker

मो. नं. ८८३०८४५४८२Mo. No. 8830845482

श्रीमती.छाया विनोद कापगतेRemati. Chaya Vinod Kapagate

अंगणवाडी मदतनीसAnganwadi Helper

मो. नं. ९२८४५८७१३९Mo. No. 9284587139

अंगणवाडी केंद्र आमगाव/खुर्द Anganwadi Center Amgaon/Khurd

सौ. रेखा प्रभुदास केवटMrs. Rekha Prabhudas Kevat

अंगणवाडी सेविकाAnganwadi Worker

मो. नं. ७४९८४२७०४३Mo. No. 7498427043

सौ. रज्जू भजन नारनवरेMrs. Rajju Bhajan Naranavere

अंगणवाडी मदतनीसAnganwadi Helper

मो. नं. ७३७८३०६५३३Mo. No. 7378306533

अंगणवाडी केंद्र पिटेझरी Anganwadi Center Pitejhari

श्रीमती.पुष्पा मोहन मडावीMrs. Pushpa Mohan Madavi

अंगणवाडी सेविकाAnganwadi Worker

मो. नं. ७४९९१३४१६६Mo. No. 7499134166

श्रीमती.सविता दसाराम टेकामSmt.Savitha Dasaram Tekam

अंगणवाडी मदतनीसAnganwadi Helper

मो. नं. ७४९८३१७६६१Mo. No. 7498317661

आंगनवाडी केंद्र - खैरी , वलमाझरी, पिटेझरी , आमगाव/खुर्दAnganwadi Center - Khairi, Walmazari, Pitezari, Amgaon/Khurd

ग्रामपंचायत खैरी वलमाझरी अंतर्गत खैरी, वलमाझरी, पिटेझरी आणि आमगाव/खुर्द येथे आंगनवाडी केंद्रे कार्यरत आहेत, जी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या केंद्रांमध्ये बालकांसाठी पोषणयुक्त आहार पुरवला जातो, तसेच पूर्वशालेय शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना शालेय शिक्षणासाठी तयार केले जाते. गर्भवती व स्तनदा मातांसाठी पोषण व आरोग्य व्यवस्थापनावर विशेष लक्ष दिले जाते आणि त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाते. याशिवाय, बालकांसाठी वेळेवर लसीकरण आणि आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. आशा कार्यकर्त्यांच्या मदतीने स्वच्छता व आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम राबवले जातात. या केंद्रांमुळे बालकांचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास होऊन त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम केले जात आहे.Anganwadi centers are functioning at Khairi, Walmazari, Pitezari and Amgaon/Khurd under Gram Panchayat Khairi Walmazari, which are playing an important role in the overall development of children. These centers provide nutritious food to children, and prepare them for school education through pre-school education. Special attention is paid to nutrition and health management for pregnant and lactating mothers and they are given proper guidance. Apart from this, timely vaccination and health check-up facilities are available for children. Awareness programs on cleanliness and health are implemented with the help of ASHA workers. Due to these centers, children are being physically, mentally and socially developed and empowered for a bright future.

प्रमुख योजनाMajor Schemes

1. बेटी बचाओ बेटी पढाओ योजना1. Beti Bachao Beti Padhao Yojana

लाभार्थी: महिला व मुलीBeneficiaries: Women and Girls

वर्णन:Description:

या अभियानांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत मुलींच्या समान दर्जा, शिक्षण व सुरक्षिततेसाठी जनजागृती व कृतीशील उपाययोजना राबविल्या जातात. लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी ज्या जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर कमी आहे, तिथे विशेष लक्ष दिले जाते. Under this campaign, awareness and proactive measures are implemented for equal status, education and safety of girls through the Integrated Child Development Service Scheme. Special attention is given to districts where the birth rate of girls is low to improve the sex ratio.

उद्दिष्टे:Objectives:

  1. लिंग निवड प्रथा निर्मूलनElimination of sex selection practices
  2. बालिकेच्या जीवित व सुरक्षिततेची हमीGuaranteeing the life and safety of the child
  3. मुलींच्या शिक्षण व सामाजिक सहभागाला प्रोत्साहनPromoting girls' education and social participation

योजनेचे स्वरूप:Nature of the scheme:

  • गर्भवती मातांची नोंदणी व जनजागृतीRegistration and awareness of pregnant mothers
  • मुलींच्या जन्माचे स्वागत व वाढदिवस साजरे करणेWelcoming the birth of girls and celebrating their birthdays
  • आरोग्य शिबिरे, मार्गदर्शन, पथनाट्य, विविध स्पर्धाHealth camps, guidance, street plays, various competitions
  • गुड्डा-गुड्डी बोर्डच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी लिंग गुणोत्तर दर्शविणेDisplaying gender ratio in public places through Gudda-Guddi boards
  • केंद्र शासनाच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेच्या अंतर्गत कार्यक्रमPrograms under the Central Government's Beti Bachao, Beti Padhao Yojana

अंमलबजावणी यंत्रणा:Implementation mechanism:

  • जिल्हा कृतीदल (अध्यक्ष: जिल्हाधिकारी)District Action Team (Chairman: District Collector)
  • प्रमुख विभाग: आरोग्य, महिला व बाल विकास, सामाजिक न्याय, शिक्षण, पंचायतराज, ग्राम विकास, विधी व न्यायMajor Departments: Health, Women and Child Development, Social Justice, Education, Panchayat Raj, Rural Development, Law and Justice
  • स्वयंसेवी संस्था व इंडियन मेडिकल असोसिएशन यांचा सहभागParticipation of NGOs and Indian Medical Association

2. बेबी केअर किट योजना2. Baby Care Kit Plan

लाभार्थी: अंगणवाडी केंद्रात नोंदणी केलेल्या व शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र/रुग्णालयात नाव नोंदणी व प्रसूती झालेल्या महिला (पहिली प्रसूती)Beneficiaries:Women registered in Anganwadi Center and registered and delivered in Government Primary Health Center/Hospital (First Delivery)

वर्णन:Description:

महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीनुसार, पहिल्या प्रसूतीवेळी ₹2000 किंमतीचे बेबी केअर किट नवजात बालकासाठी मोफत दिले जाते. As per the approval of the Maharashtra Government, a baby care kit worth ₹2000 is provided free of cost to the new-born during the first delivery.

उद्दिष्टे:Objectives:

  1. शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीसाठी प्रोत्साहनIncentives for deliveries in government health centers
  2. बाल मृत्यू दर कमी करणेReducing child mortality rate
  3. माता व नवजात बालकाच्या आरोग्याची काळजीMaternal and new-born health care

योजनेचे स्वरूप:Nature of the scheme:

बेबी केअर किटमध्ये समाविष्ट साहित्य:Materials included in the baby care kit:

  • लहान मुलांचे कपडे, लंगोट, झोपण्याची गादी, टॉवेलBaby clothes, diapers, sleeping pads, towels
  • इलेक्ट्रॉनिक थर्मामीटर, मच्छरदाणी, गरम ब्लँकेटElectronic thermometer, mosquito net, heated blanket
  • प्लास्टिक चटई, खेळणी (खुळखुळा), नेलकटरPlastic mat, toys (clumsy), nail clippers
  • हातमोजे, पायमोजे, बांधण्यासाठी कापड, आईसाठी लोकरीचे कापडGloves, socks, cloth for tying, woolen cloth for mother
  • साहित्य ठेवण्यासाठी लहान बॅगSmall bag for storing materials

निकष / कार्यप्रणाली:Criteria / Procedure:

  • गरोदर महिलेने ९व्या महिन्यात जवळच्या अंगणवाडी केंद्रात अर्ज करावा.A pregnant woman should apply to the nearest Anganwadi center in the 9th month.
  • अंगणवाडी सेविका लाभार्थी महिलेस बेबी केअर किट प्रदान करते.Anganwadi worker provides baby care kit to the beneficiary woman.

3. आदर्श अंगणवाडी योजना3. Ideal Anganwadi Scheme

लाभार्थी: महिला आणि अंगणवाडीतील सर्व बालकेBeneficiaries:Women and all children in Anganwadi

वर्णन:Description:

अंगणवाडी सेविकेमार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य, पोषण आहार व पूर्वप्राथमिक शिक्षण पुरवले जाते. यासाठी आदर्श अंगणवाडी केंद्रांची निर्मिती करण्यात येते, ज्यामध्ये मुलांना आनंददायी वातावरणात शिक्षण व पोषण प्रदान केले जाते. तसेच किशोरवयीन मुली आणि महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. Health, nutrition and pre-primary education are provided through Anganwadi workers under the Integrated Child Development Service Scheme. For this, model Anganwadi centers are being created, in which children are provided education and nutrition in a pleasant environment. Also, skill development training is provided to adolescent girls and women.

उद्दिष्टे:Objectives:

  1. अंगणवाडी केंद्रांचे दर्जा सुधारून आदर्श अंगणवाडीमध्ये रुपांतरीत करणे.To improve the quality of Anganwadi centers and convert them into model Anganwadi centers.
  2. अंगणवाडी केंद्राचे शिक्षण व परिसर आनंददायी करणे.Making the education and environment of the Anganwadi center pleasant.

योजनेचे स्वरूप:Nature of the scheme:

  • आधुनिक सुविधांचा समावेश:Modern amenities include:
    • सौर उर्जा संच, शैक्षणिक साहित्य, ई-लर्निंग, LED TV with USB port, Pen driveSolar Power Set, Educational Materials, E-Learning, LED TV with USB port, Pen drive
    • बालकांसाठी खुर्च्या, टेबल, स्वच्छ भारत संच, वॉटर प्युरिफायर (वीज विरहीत)Children's chairs, tables, Swachh Bharat set, water purifier (electricity-free)
    • इमारतीची बाह्य रंगरंगोटी, सुशोभिकरण, शौचालय दुरस्ती, परिसर स्वच्छताExterior painting of the building, beautification, toilet repairs, cleaning of the premises
  • सन २०१८-१९ पासून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.The implementation of the scheme has started from the year 2018-19.
  • स्वमालकीच्या इमारतीमध्ये अंगणवाड्यांचे आदर्श अंगणवाडीत रुपांतरण.Conversion of Anganwadis into model Anganwadis in self-owned buildings.

निकष / कार्यप्रणाली:Criteria / Procedure:

  • ६८,000 अंगणवाड्यांची निवड केली असून, १६,८८५ अंगणवाड्यांचे रुपांतरण आदर्श अंगणवाडीत करण्यात आले आहे.68,000 Anganwadis have been selected and 16,885 Anganwadis have been converted into model Anganwadis.

4. लेक लाडकी योजना4. Lek Ladki Yojana

लाभार्थी: ० ते १८ वर्षे वयोगटातील मुली.Beneficiaries:Girls aged 0 to 18 years.

वर्णन:Description:

  • "माझी कन्या भाग्यश्री" (सुधारीत) या योजनेला अधिक्रमित करून, १ एप्रिल २०२३ पासून "लेक लाडकी" योजना सुरू करण्यात आली आहे.The "Lek Ladki" scheme has been launched from April 1, 2023, replacing the "Majhi Kanya Bhagyashree" (Revised) scheme.
  • ही योजना केवळ पिवळ्या किंवा केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबातील मुलींना लागू आहे.This scheme is applicable only to girls from families holding yellow or orange ration cards.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.The annual income of the beneficiary family should not exceed Rs. 1 lakh.

उद्दिष्टे:Objectives:

  1. मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन जन्मदर वाढवणे.Increasing the birth rate by encouraging the birth of girls.
  2. मुलींच्या शिक्षणाला चालना देणे.Promoting girls' education.
  3. बालमृत्यू दर कमी करणे आणि बालविवाह रोखणे.Reducing child mortality rates and preventing child marriage.
  4. कुपोषण कमी करणे.Reducing malnutrition.
  5. शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे.Bringing the number of out-of-school girls to zero.

योजनेचे स्वरूप:Nature of the scheme:

  • मुलीच्या जन्मानंतर ₹५,०००₹5,000 after the birth of a girl child
  • इयत्ता पहिली: ₹६,०००Class 1: ₹6,000
  • इयत्ता सहावी: ₹७,०००Class 6: ₹7,000
  • इयत्ता अकरावी: ₹८,०००Class XI: ₹8,000
  • १८ वर्षे पूर्ण झाल्यावर: ₹७५,०००After completing 18 years: ₹75,000
  • एकूण लाभ: ₹१,०१,०००Total benefit: ₹1,01,000

निकष / कार्यप्रणाली:Criteria / Procedure:

  1. १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या जास्तीत जास्त दोन मुलींना ही योजना लागू असेल.This scheme will be applicable to a maximum of two girls born on or after April 1, 2023.
  2. एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास, फक्त मुलीला लाभ मिळेल.If there is a boy and a girl, only the girl will get the benefit.
  3. कुटुंब नियोजन प्रमाणपत्र पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी आवश्यक असेल.A family planning certificate will be required for the third installment for the first child and the second installment for the second child.
  4. दुसऱ्या प्रसूतीत जुळी अपत्ये जन्माला आल्यास, एक किंवा दोन्ही मुलींना लाभ मिळेल. मात्र, त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.If twins are born in the second pregnancy, one or both girls will benefit. However, family planning surgery is required afterwards.
  5. लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक.The beneficiary's family must be a resident of the state of Maharashtra.
  6. लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे बंधनकारक.It is mandatory for the beneficiary to have a bank account in the state of Maharashtra.
  7. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹१ लाखांपेक्षा जास्त नसावे.The annual income of the family should not exceed ₹1 lakh.

अंगणवाडी कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमAnganwadi programs and social activities

1. पौष्टिक आहार – आरोग्यदायी भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल!1. Nutritious diet – an important step towards a healthy future!

आंगनवाडी केंद्रांमध्ये गरोदर माता आणि लहान मुलांसाठी पोषणयुक्त आहार प्रदान केला जातो, जेणेकरून कुपोषण टाळता येईल आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल. या योजनेअंतर्गत गर्भवती आणि स्तनदा मातांना आवश्यक प्रथिने, जीवनसत्त्वे व पोषकतत्त्वांनी युक्त आहार दिला जातो, ज्यामुळे त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्याची योग्य निगा राखली जाते. तसेच, लहान मुलांना संतुलित आहार पुरवण्यात येतो, ज्यामध्ये दूध, फळे, डाळी, सुकामेवा आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असतो. नियमित आरोग्य तपासणी आणि पोषण जनजागृती कार्यक्रमाद्वारे माता आणि पालकांना योग्य आहार घेण्याबाबत मार्गदर्शन केले जाते. या उपक्रमामुळे बालकांचे शारीरिक आणि मानसिक विकासात सकारात्मक बदल होत असून, कुपोषण रोखण्यास मदत होत आहे.Anganwadi centers provide nutritious food to pregnant mothers and young children to prevent malnutrition and improve their health. Under this scheme, pregnant and lactating mothers are provided with food rich in essential proteins, vitamins and nutrients, which ensures proper health care for them and their babies. Also, young children are provided with a balanced diet, which includes milk, fruits, pulses, dry fruits and green leafy vegetables. Mothers and parents are guided on proper diet through regular health check-ups and nutrition awareness programs. This initiative is bringing positive changes in the physical and mental development of children and is helping to prevent malnutrition.

2. आरोग्य सेवा – लसीकरणामुळे सुरक्षित बालपण!2. Healthcare – Safe childhood through vaccination!

आंगनवाडी केंद्रांमध्ये लहान बालकांचे वेळेवर लसीकरण करण्यात येते, जे त्यांना घातक रोगांपासून संरक्षण देते. टिबी, धनुज्वर, पोलिओ, गोवर, हिपाटायटिस आणि इतर संसर्गजन्य रोगांवर प्रतिबंध करणाऱ्या लसी दिल्या जातात, जेणेकरून बालकांचे आरोग्य सुदृढ राहील आणि भविष्यात त्यांना गंभीर आजारांपासून संरक्षण मिळेल. तसेच, गर्भवती आणि स्तनदा मातांसाठीही आवश्यक लसीकरण मोहीम राबवली जाते, ज्यामुळे आई आणि बाळ दोघांचेही आरोग्य सुरक्षित राहते. या मोहिमेअंतर्गत पालकांना लसीकरणाचे महत्त्व समजावले जाते आणि त्यांना वेळोवेळी लसीकरणाबाबत जागरूक केले जाते. आंगनवाडी केंद्र, आरोग्य सेवक आणि आशा कार्यकर्त्यांच्या मदतीने या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली जाते, ज्यामुळे बालकांचे आरोग्य अधिक सक्षम आणि सुरक्षित राहते.In Anganwadi centers, young children are vaccinated on time, which protects them from dangerous diseases. Vaccines against TB, tetanus, polio, measles, hepatitis and other infectious diseases are given, so that the health of children remains good and they are protected from serious diseases in the future. Also, necessary vaccination campaigns are carried out for pregnant and lactating mothers, which ensures the health of both the mother and the child. Under this campaign, the importance of vaccination is explained to the parents and they are made aware about vaccination from time to time. This initiative is effectively implemented with the help of Anganwadi centers, health workers and ASHA workers, which makes the health of children more capable and safe.

3. माता आणि बालकांचे आरोग्य – पोषण स्थितीचे नियमित निरीक्षण!3. Regular monitoring of maternal and child health – nutritional status!

आंगनवाडी केंद्रांमध्ये माता आणि बालकांचे वजन आणि पोषण स्थितीची नियमित नोंद ठेवली जाते, जेणेकरून त्यांच्या आरोग्याचा विकास योग्य प्रकारे होतोय की नाही यावर लक्ष ठेवता येईल. दरमहा वजन तपासणी, उंची मापन आणि पोषण स्थितीचे मूल्यमापन करण्यात येते, ज्यामुळे कुपोषित बालक व माता यांना ओळखून त्यांच्यासाठी विशेष पोषण योजना राबवता येतात. जर कुठल्या बालकाचे वजन कमी असल्याचे आढळले, तर त्याला विशेष आहार दिला जातो आणि त्याच्या पालकांना योग्य आहार मार्गदर्शन दिले जाते. तसेच, गर्भवती महिलांचे वजन तपासून त्यांच्या पोषण स्थितीवर लक्ष ठेवले जाते, जेणेकरून त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्याला कोणताही धोका निर्माण होऊ नये. आरोग्य तपासणी आणि पोषण जनजागृती कार्यक्रमाद्वारे माता व पालकांना संतुलित आहाराचे महत्त्व समजावले जाते, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.Regular records of the weight and nutritional status of mothers and children are kept in Anganwadi centres so that their health development can be monitored. Monthly weight checks, height measurements and nutritional status assessments are carried out to identify malnourished children and mothers and implement special nutrition plans for them. If any child is found to be underweight, he is given special food and his parents are given proper dietary guidance. Also, the weight of pregnant women is checked and their nutritional status is monitored so that there is no risk to their health and that of the baby. Through health check-ups and nutrition awareness programmes, mothers and parents are made aware of the importance of a balanced diet, which helps in improving the health of the entire family.

4. महिला सशक्तीकरण – आरोग्यदायी आणि सक्षम भविष्यासाठी मार्गदर्शन!4. Women Empowerment – ​​Guidance for a Healthy and Capable Future!

महिला आणि मातांसाठी विशेष माता-पालक सल्ला केंद्र कार्यरत आहे, जिथे त्यांना गर्भधारणा, स्तनपान, पोषण आणि कुटुंब नियोजनाविषयी मार्गदर्शन केले जाते. या केंद्राच्या माध्यमातून गर्भवती महिलांना त्यांच्या आहाराची आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत सल्ला दिला जातो. तसेच, स्तनपानाचे महत्त्व आणि नवजात बाळाच्या पोषणासाठी त्याचा योग्य कालावधी याबाबत माहिती दिली जाते. कुटुंब नियोजनासंदर्भात महिलांना योग्य आणि सुरक्षित पर्यायांचे मार्गदर्शन दिले जाते, जेणेकरून त्या आरोग्यपूर्ण निर्णय घेऊ शकतील आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुस्थितीत घडवू शकतील. या उपक्रमामुळे महिला अधिक आत्मनिर्भर आणि जागरूक होत असून त्यांच्या आरोग्यात सुधारणा होत आहे.A special maternal and child counseling center is functioning for women and mothers, where they are guided on pregnancy, breastfeeding, nutrition and family planning. Through this center, pregnant women are advised on how to take care of their diet and health. Also, information is given about the importance of breastfeeding and its appropriate duration for the nutrition of the new-born. Women are guided on appropriate and safe options regarding family planning, so that they can make healthy decisions and shape the future of their family in a healthy way. Due to this initiative, women are becoming more self-reliant and aware and their health is improving.

5. पोषण माह – निरोगी जीवनशैलीसाठी एक पाऊल पुढे!5. Nutrition Month – A step forward for a healthy lifestyle!

दरवर्षी सप्टेंबर महिन्यात 'पोषण माह' साजरा केला जातो, ज्यामध्ये पोषण जागरूकता उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांतर्गत गर्भवती व स्तनदा माता, लहान बालक, शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. पोषण ताट स्पर्धा, आहार जागरूकता सत्रे, लहान मुलांचे वजन व पोषण स्थिती तपासणी, महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन आणि आंगनवाडी केंद्रांमध्ये विशेष पोषण आहार वाटप यांसारखे उपक्रम घेण्यात येतात. यामुळे कुपोषण टाळण्यास मदत होते आणि लोकांमध्ये संतुलित आहाराबाबत सकारात्मक बदल घडतो. या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैलीची सवय लागावी आणि प्रत्येक व्यक्ती पोषणसमृद्ध आहाराकडे वळावा हा मुख्य उद्देश आहे.Every year in the month of September, 'Poshan Maah' is celebrated, in which nutrition awareness activities are carried out. Under this initiative, various programs are organized to convince pregnant and lactating mothers, young children, school students and villagers of the importance of a balanced diet. Activities like Poshan Taat competition, diet awareness sessions, weight and nutritional status check-up of children, health guidance for women and distribution of special nutritional food at Anganwadi centers are taken up. This helps in preventing malnutrition and brings about a positive change in the people regarding a balanced diet. The main objective of this campaign is to inculcate the habit of a healthy lifestyle and make every person switch to a nutritious diet.