Grampanchayat Khairi – Walmazari

 १००% कर वसुली - ग्रामपंचायतीचा आदर्श उपक्रम

ग्रामपंचायत खैरी वलमाझरीने कर वसुलीत १००% यश मिळवून आदर्श निर्माण केला आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून कर भरण्याचे महत्त्व समजावले आणि प्रोत्साहन दिले. सर्व कर वेळेवर वसूल केल्यामुळे गावातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. या उपक्रमामुळे पारदर्शकता वाढली असून ग्रामपंचायत स्वावलंबी बनत आहे.